‘रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशन’ कडून हाई-फ्लो ऑक्सीजन थेरेपी मशीन भेट - अभिजीत श्याम पन्हाळे

     ‘कोराना’ संकटाशी सामना करण्यासाठी येथील रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनच्यावतीने बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी हाई-फ्लो ऑक्सीजन थेरेपी मशीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

      पुणे विधानभवन परिसातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनचे अभिजीत श्याम पन्हाळे यांनी हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन सुपूर्द केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, फाऊंडेशच्या संगिता पन्हाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

raosaheb shankar ramchandra Panhale FOUNDATION distribute High Flow oxygen therapy device     करोना चा सामना करताना अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता लागत आहे. व्हेंटिलेटर ला पर्याय म्हणून ही मशीन काम करते, रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाउंडेशनच्या वतीने श्री अभिजीत पन्हाळे व सौ संगीता पन्हाळे यांनी मास्क सॅनिटायझर व गरजूंना धान्याचे वाटप केले असून वरील प्रमाणे अशीच एक मशीन पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल लाही  फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे .अभिजीत पन्हाळे  यांचे आजोबा रावसाहेब शंकर पन्हाळे यांच्या नावाने हे फाउंडेशन चालू असून ,फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात .आत्तापर्यंत श्री अभिजीत पन्हाळे व सौ संगीता पन्हाळे यांनी समाजासाठी फार मोलाचे कार्य केलेले आहे. 

    रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनचे अभिजीत पन्हाळे म्हणाले, “आमचे आजोबा रावसाहेब शंकर पन्हाळे यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कोरोना’ काळात सामाजिक संघटनांना सामाजिक बांधिलकी राखत गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार आम्ही या कालावधीत विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांतर्गत ही हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन आम्ही बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाला देत आहोत. 

    ‘कोराना’च्या संकटाशी सामना करताना अनेक रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता लागत आहे. व्हेंटीलेटरला पर्याय म्हणून ही हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन काम करते. या मशीनचा उपयोग ‘कोरोना’ बाधीत रुग्णांना होणार आहे. या ‘कोरोना’ कालावधीत फाऊंडेशनच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, धान्याचे वाटप करण्यात आले आहेत. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटललाही ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन फाउंडेशनच्यावतीने देण्यात आली आहे.”

दिनांक 30-09-2020 19:29:08
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©