तेली समाज सेवक श्री महेंद्र महाकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परिस्थितीवर मात करून  नेहमी आनंदी रहावे - लक्ष्मीताई महाकाळ

   औरंगाबाद,  प्रतिनिधी, -  जीवन जगतांना अनेक अडचणी संकटे येतात पण खचून न जाता  संकटाला धैर्याने समोर जाऊन संकटांवर मात करावी. तेली समाज सेवक श्री महेंद्र महाकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या प्रसंगी त्या बोलत होत्या पुढे बोलतांना त्या म्हणाल्या माणुस छोटा मोठा असे काही नसते जो तो आप आपल्या क्षमतेने परिपूर्ण असतो. तुमच्याकडे किती पैसा किती प्रॉपर्टी आहे याचे कोणाला काही देणे घेणे नसते. तुमचा स्वभाव तुमचं वागणं तुमचं काम कर्तव्य या वरच तुमचे महत्व ठरत असते.तुमचं निर्मळ मन हीच तुमची खरी श्रीमंती आहे या वरून तुम्हाला समाज लाईक करतो तुम्ही चांगले तर जग चांगलं आहे. असे मला वाटते कलियुगा मध्ये आयुष्य फक्त शंभर वर्षाचे आहे.वरचे 25 तर काढूनच टाका हो खरं जीवन हे 75 वर्षाचे आहे.त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागावे व नेहमी आनंदी राहावे हीच तर जीवन जगण्याची खरी कला आहे.परिस्थिती कशीही असो खचून न जाता परिस्थितीवर मात करता आली पाहिजे.

जिंदगी से कह दो उलझे  न हमसे हमे हर हाल मे जिंदगी जीने का हुनर आता है.

     समाजासाठी मला जे काही करता येईल ते ते मी करीत राहिल. समाजातील सर्व घटकांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना मी ईश्वराकडे करतो.अशा भावना महेंद्र महाकाळ आपल्या भावना व्यक्त केल्या. तेली समाज प्रेमी,समाज सेवक,कुलदीप राऊत यांनी संत जगनाडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पुढाकार घेऊन यशस्वी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

 गणेश पवार, पत्रकार, औरंगाबाद

Aurangabad Teli Samaj Sevak Mahendra Mahakal Birth day Celebration

दिनांक 28-12-2019 15:38:57
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©