महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा युवक आघाडी प्रदेश संघटन सचिव पदी - गणेश पवार 

         औरंगाबाद,(प्रतिनिधी)  -  अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या व कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी यांनी गणेश पवार यांची निवड केली.गणेश पवार यांनी औरंगाबाद शहरात विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करून समाज संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच त्यांचा महाराष्ट्रातील तेली समाज बांधवांशी दांडगा जनसंपर्क आहे. दिल्ली येथे आयोजीत तेली एकता रॅली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवार यांनी महाराष्ट्रात संपर्क अभियान राबवून जनजागृती केली होती.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील नियुक्त्या करून दोन महिन्यात अहवाल सादर करावा  अशा सूचना गणेश पवार यांना देण्यात आल्या.समाजातील कर्तव्यदक्ष प्रामाणिक  कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहे.या निवडी बद्दल राष्ट्रीय तेली समाज साहू महासभेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर अरुण भस्मे,युवक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयभाऊ चौधरी,प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी,प्रवक्ते विक्रांत चांदवडकर, प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी,विभागीय उपाध्यक्ष दीपक चौधरी,अहमदनगर जिल्हा  युवक उपाध्यक्ष व नगर नाशिक  विभागीय अध्यक्ष विजय काळे, धुळे,जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी,अहमदनगर तेली समाज अध्यक्ष अरविंद दारूणकर, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ देवकर,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष किरण चौधरी,औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष कचरु वेळंजकर,जे.यू.मिटकर, विश्वनाथ गवळी,कृष्णा ठोंबरे, भारत (नाना )कसबेकर,अशोक लोखंडे,राजू केदार,सुनिल लोखंडे,राजेश लोखंडे,सुरेश कर्डिले,शंकर चौथे,गणेश शिंदे,अशोक चौधरी अशोक मिटकर,कचरदास राऊत,नारायण दळवे,रमेश शिरसागर,कैलास सिदलंबे,सुनिल सोनवणे,महेंद्र महाकाळ,एस.के.दादा चौधरी,सुरेश वाघळव्हाळे, एकनाथ पेंढारे,भगवान मिटकर, बद्रीनाथ ठोंबरे,संतोष वाळके, सुनील शिरसागर,अनिल शिरसागर,विनोद मिसाळ,संतोष सुरूळे,योगेश शेलार,राहुल मगर, संतोष कार्प,नितीन तावडे, शिवा महाले आदींनी अभिनंदन केले.

Maharashtra Prantika teli Samaj Mahasabha Yuvak Aghadi Sachiv Ganesh Pawar

दिनांक 22-12-2019 10:28:22
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©