अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या झालेल्या राज्यव्यापी बैठकीत येथील शामकांत जगन्नाथ ईशी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिर्डी येथे तेली महासभा युवक आघाडीची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर होते. शामकांत ईशी यांची एकमताने प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नियुक्तपत्र देत सत्कार करण्यात आला.
अहमदनगर दि. ७ : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळा ढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर करणार बैठकीला संबोधित
नगर- महाराष्ट्र राज्य प्रतीक तेली समाज महासभेची राज्यस्तरीय बैठक यावर्षी शिर्डी येथे होणार आहे. अखिल भारतीय तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या बैठकीला संबोधित करणार असल्याची माहिती नाशिक विभाग प्रांतिक तेली समाज महासभेचे महासभेचे उपाध्यक्ष विजय काळे यांनी दिली.
तेली समाजाच्या वतीने ना. विजय वडेट्टीवार यांचा सत्कार
नगर - तेली समाजाचे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे तेली समाजाचे कार्य सुरु आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेचे पदाधिकारी नगर जिल्ह्यात संघटन करुन समाजाच्या उन्नतीसाठी विविध समाजपयोगी कार्य करीत आहेत. तैलिक संघटनेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी तेली समाजाचे अनेक वर्षांपासून असलेले प्रलंबित प्रश्न निवेदनाद्वारे मांडले आहेत.
सुदुंबरे - श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा २०२१ चे नियोजनाची सभा श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी झाली. कोरोनामुळे यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सोहळा मुख्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे, यावर्षी ११ जानेवारी आणि १२ जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम समाज मेळावा, शिक्षण समिती कार्यक्रम, दुसऱ्या दिवशीची वार्षिक सर्वसाधारण आणि महाप्रसाद असे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
शिर्डी : अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिडी शहर तेली समाजाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात येणार असून, याचा शुभारंभ साईनगरीच्या प्रांत कार्यालयापासून करण्यात आला.
शिरपूर - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी यांच्या वतीने संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ डिसेंबर पर्यंत निबंध पाठवावेत ही निबंध स्पर्धा संत शिरोमनी संताजी जगनाडे महाराज आणि आजचा तेली समाज या विषयावर आयोजित करण्यात आलेली आहे.