योगी व मोदिंच्या राज्यात तेली भगीनींनवर अत्याचार..... बलात्कार व खुन .... तरी महाराष्ट्रात हर हर मोदी

     इलाहाबाद :- हर हर  मोदी घर घर मोदी ? पंतप्रधान तेली आहेत आपला अभिमान देशाचा पंतप्रधान म्हणुन महाराष्ट्रात व देशभरात मोदींच्या तेली जन्मा मुळे हिमालयाची उंची गाठणारे प्रेम निर्माण करून लाभार्थी होण्यासाठी तुकडा सुद्धा पुरा आहे. आणी तो मिळवणारे आहेत. त्या साठी तेली समाजाचे संघटन कामाला जुंपवून मिळालेला तुकडा म्हणजे संपूर्ण सुर्य समजुन सत्काराचे फड गाजवणारे आहेत. त्यांना आपला तुकडा व होयबाची पलटण या पेक्षा सहसा काहीच दिसत नाही. हि निष्ठा हे समाज प्रेम उघड केले तर यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात . मध्ययुगीन काळाचा वापर करून हे वावरत असतात. त्यांना समाजावर अत्याचार, अन्याय, दादागिरी करणारे दिसत असुन दिसत नसतात कारण या बद्दल बोलावे तर मिळालेला तुकडाच जाण्याची जबरदस्त भिती.

    दिनांक 23 एप्रिल रोजी इलाहाबाद मधील एक तेली कुटूंब रात्री जेवन करून सुखात झोपी गेले. ती रात्र काळ रात्र ठरली. घरात लग्नाला आलेल्या दोन मुली व आई वडील होते. मध्यरात्र जवळ आली. सर्वत्र शांतता होती. आशाा या काळ रात्री घराचा दरवाजा फोडून गुंड घरात आले आणी वडिलांचे हात पाय बांधून तोंड बंद केले. त्यांच्या देखत त्या दोन्ही मुलींवर अत्याचार केले. एवढे करून ते थांबले नाहीत तर त्या दोन ही मुलींचा खुन केला. हे दोन खुन करताच बाहेर जाता जता आई वडिलांचा ही खुन केला. मी उत्तर प्रदेशचा पुत्र म्हणून कंठशोक करणार्‍या मोदींच्या मतदार संघा जवळ ही भयान घटना घडली आहे. एवढे होऊन ही ना योगी ना मोदीनीं दखल घेतली. काही बांधवांनी रस्त्यावर उतरले तेंव्हा कुठे पोलिस निदान चौकशी तरी करू लागले. कदाचीत  ही नवटंकी असेल अशी ही वेदना युपी मधील बांधवांनी जाहीर केली. या देशाचे पंतप्रधान मोदी हे तेली आहेत का जळजळीत सवाल फक्त आम्ही केला आहे. त्यांचा भाजपा व मातृसंस्था यांचा प्रश्न वेगळा आहे. उगच कुणाचे तरी ढोल बडवून बेडका सारखे फुगून जे होते तेच उत्तरप्रदेशात घडले आहे. येथील स्थांनीक बांधवांनी मिडीया समोर सांगीतले या पुर्वी असे अत्याचार अखीलेश यादवांच्या काळात घडत. त्या ही पेक्षा मोठे आत्याचार. एक मोदी तेली म्हणुन सांगीतले म्हणुन मतदान केले. ते केले म्हणुन तेली समाजावर बलत्कार व खुन का ? मोदींच्या तेलीपनावर ढोल बडवणार्‍या भक्तांना सत्य समजुन घेण्याची शक्ती मिळो. हीच या समाज भगिनींना भावपुर्ण श्रद्धांजली अशी ही इच्छा काही बांधवानी व्यक्त केली.

दिनांक 11-05-2017 02:28:43
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com