अमरावती जिल्हा तेली समाज ऊन्हाळी विज्ञान छंद शिबीरउत्साहातसाजरे

 ‌     समाजासाठी लढणारी व समाजा सोबतच इतरही समाजासाठी सामाजिक उपक्रम राबवनारे अमरावती जिल्हा तैलिक ( तेली  समाज ) समिती तर्फे दरवर्षी ऊन्हाळी विज्ञान छंद शिबीराचे आयोजन करत असते.

    संताजी भवन, भुमीपुञ काँलनी परीसरात यावर्षी सुद्धा २ ते ९ मे या महिन्यात ऊन्हाळी नाविण्यपूर्ण विज्ञान छंद शिबीर ( Aero Dynamic Workshop) यशस्वी रीतीने पार पडले.

        यावेळी समारोपीय कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .मधुकरराव सव्वालाखे अध्यक्ष (अम.जिल्हा तैलिक समिती )प्रमुख पाहुणे श्री .डॉ.प्रा.निशिकांत डब्लु.काळे (प्राचार्य राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय बडनेरा.) डाॕ. किशोर अंबाडेकर, मिलिंद राजगुरे (शिक्षण अधिकारी ) व प्रशिक्षक श्री .प्रविण गुल्हाने सर व्यास पिटावर उपि‍स्थित होते.

      कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा.स्वप्निल खेडकर यांनी ८ दिवसाच्या शिबिरातील केलेल्या कार्याची तसेच विद्यार्थिनी बनविलेल्या मॉडेल वर आधारित २० मिनिटाची चित्रफीत दाखवण्यात आली.व मुलांनी बनविलेल्या विमान ,ग्लायडर ,हेलिकॉप्टर ड्रोन,रॉकेट याचे प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले तसेच कु.आदीती मांडवे,चि. प्रदक्ष सवई,व चि.अथर्व सकसुले यांनी शिबिरातील अनुभव व्यक्त कले.

डाॕ.राजेंद्र गोडे इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि अँड रिसर्च अमरावती चे प्रा.स्वप्निल खेडकर यांनी आपल्या प्रास्तविक पर भाषणात समिती सोबत काम करण्याचे अनुभव व शिबीर प्रमुखाची ची जबाबदारी व शिबिरातील ८ दिवसाचे अनुभव कथन केले.

अमरावती जिल्हा तैलिक समितीने आजवर केलेले उपक्रम हे प्रसिद्धी व आर्थिक फायदा मिळविण्यासाठी नसून समाजाच्या भल्यासाठी व आनंद मिळवण्याची तसेच मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा.व माजी राष्टपती डाॕ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रेरणा घेऊन एरोनॉटिकल इंजिनीअर होण्याचे स्वप्न ,धाडस मुलांनी करायला हवं.अशे उपस्थित मान्यवरांनी मुलांना मार्गदर्शन केले.

    प्रशिक्षक श्री .प्रविण गुल्हाने सर यांचा मान्यवरांचे हस्ते आदर सत्कार करण्यात आला.व शिबिरातील भाग घेणाऱ्या विद्यार्थाना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तसेच करिअर इन अॕरानॉटिकल इंजिनीअर या वर मार्गदर्शन प्रा.विनय राजगुरे सरांनी केले .प्रास्तविक प्रा.स्वप्निल खेडकर व श्री.मिलिंद शिरभाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

    यावेळी अमरावती जिल्हा तैलिक समितीचे उपाध्यक्ष प्रा.संजय आसोले,डाॕ. अनुप शिरभाते ,श्री.मिंलीद शिरभाते,श्री.सजंय रायकर, यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभले व समस्त संचालक मडंळ व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्ननातून हा आजचा समारोपीय कार्यक्रम यश्यवी रीतीने पार पडला.यावेळी विद्यार्थी पालक व मोठा प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. Amravati teli samaj Vigyan Shibir 2016

दिनांक 10-05-2017 15:52:18
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
You might like:
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com