श्री भवानी माता, तेली समाज व बाळाजी भगत - श्री. मोहन देशमाने

श्री भवानी माता, तेली समाज व बाळाजी भगत (भाग 2)

    तुळजापुरात नगर जवळील जी अंधरी नगरी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या बुर्‍हानगर मध्ये देवकर नावाची तेली समाजाची घरे पिड्यान पिड्या रहात होती. देवीची सेवा व पालखी पलंग हा मान होता. यामुळे देवकरांना भगत या आदर युक्त नावाने ओळखले जात असे. बुर्‍हानगर येथे बाळाजी भगत रहात होते.

tulja bhavni & teli samaj    घरचा तेल्याचा धंदा पण अंगात पुर्वजांचे शौर्य. या बळावर छोट्या मोठ्या लढाईत ते सहभागी असत. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील व गावकुसातील काही वतनदार देशमुखांची मुले त्यांच्या सोबतीला होती. आणि या मंडळींनी रोहिडेश्‍वरावर स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य स्थापना केले. विजापुर शाहीला हादरे सुर केले. शिवबाच्या स्वराज्याची दैवता तुळजाभवानी. भवानी माता व तुळजापूर ही शक्ती पिठ. दर वर्षी पालखीत तुळजापूरला घेऊन जात. याचा अनुभव येत होता. दसर्‍याला पाच दिवस व  शिलांगन खेळताना बाळाजी भगत अनुभव घेत होता. छ. शिवाजाी महाराज कित्येक वेळा या ठिकाणी येऊन सहभागी होत होत. या मुुळे ही शक्ती महाराष्ट्राची ही शक्ती स्वातंंत्र्याची होती ती जपणे हे बाळाजी कर्तव्य समजत. विजापुर शाहीला हादरे लागताच महाबलाढ्य अफजलखान शिवबावर स्वराज्यावर चाल करणार ही बातमी  बुर्‍हानगर पर्यंत धडकली हा अफजलखान कसा होता. यांच्या अनेक बातम्या पसरल्या होत्या त्याच्या नुसत्या पत्राने अनेक वतनदार आपली इनामे सुरक्षित रहावेत म्हणुन काही जन जिव मुठीत घेऊन वावरत होते. काही खबर्‍यांनी आशीही बातमी पसरवली की हा खान शिवाजीला संपवीण्यासाठी वाटेतील मंदिरे पाडणार. त्यांचे लक्ष महाशक्ती तुळजाभवानी आहे. बाळाजी भगताला हे समजताच तो सावध झाला. दहा पाच तरूण पोरांना बोलविले प्रसंगाची जाणीव करन दिली. पण नक्की काय करावयाची याची कल्पना फकत बाळाजी भगता जवळच होती. विजापुर हुन खान तुळापूर जवळ करित होता. हजारो वर्षींची ही मुर्ती खान फोडणार. तोच बाळाजी भगताने आपली योजना विश्‍वासू मंडळींना सांगितले 

दिनांक 17-11-2015 11:15:19
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com