कै. सौ. केशरकाकू आम्हा विजापूरकरांची माहेरवाशीण 

श्री. प्रकाश भोज, अध्यक्ष तेली समाज विजापूर कर्नाटक

Mrs Kesharkaku Sonajirao Kshirsagar     मचाले घराने मुळ बारामती जवळचे, व्यवसायामुळे हे घराने विजापूरात स्थीर झाले. विजापूर परिसरात करडी व शेंग पीक अमाप पिकत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तेली घराणी इथे स्थिरावली होती. मचाले यांच्या घरात 30/40 घानी होती. तेवढेच घानेकरी कामाला होते. शहरात मचाले हे प्रतिष्ठीत घराने होते. परंतू काही संकटात हे घराने सापडले व घराला गरिबी आली. ह. भ. प. कै. नामदेव मचाले पडत्या घराला सावरत होते. तेंव्हा हे मचाले कुटूंब शहा पेठेत जुन्या घरात वास्तव्यास होते. गरिबी घरात नांदत असतानाच केशरकाकूंचा जन्म झाला. जन्म होताच आई वारली. माणूस गरिब असतो तेंव्हा त्याला जे अनुभवावे लागते ते काकूंनी संस्कारक्ष वयात अनुभवले. स्वातंत्र्याच्या रण संग्रमात पंडीत नेहरू विजापूर येथे आले होते. त्या वेळी आपल्या जुन्या कपड्यांनी तिने नेहरूचे स्वागत केले होते. पंडित नेहरूंनी आर्शीर्वाद दिले. ही माहेरची साठवण काकूंनी जीवनभर संभाळली त्या गावसरपंच ते तिन वेळा खासदार झाल्या. त्यांच्यावर विजापूर येथेच संस्कारक्षम वयात संस्कार झाले होते. गरिबीवर मात करीत त्यांनी शिक्षण पुर्ण केले. येथील मराठी शाळेत शिक्षिका म्हणून ही काम केले.

    विजापूरमध्ये आम्ही महाराष्ट्रातील तेली बांधव पुर्वी शकडो होतो. आज 35 ते 40 घरे आहेत. समाजाची वास्तू होती. या वास्तूत मारूती मंदिर होते. आज भर पेठेतील वास्तूत चांगले मंदिर असून लगत शॉपिंग सेंटर ही आहे. महाराष्ट्राबाहेर तिळवण तेली समाजाची ही एकमेव संस्था असून ती आज चांगल्या प्रकारे चालवली जाते. काकू जेंव्हा जेंव्हा विजापूर मध्ये येते तेंव्हा तेंव्हा त्यांचे मचाले बंधू बरोबर असत. महाराष्ट्रापासून दूर असलेल्या समाज बांधवा विषयी हळहळ व्य्कत करीत. जाणीव पूर्वक आपल्या जन्म मातीचा अभिमान ठेवत. हा आम्हा विजापूर मधील तेली समाजाचा स्वाभीमान आहे.

दिनांक 05-06-2018 00:22:36
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com