Responsive Header Nav

श्री. आबा बागुल यांची ग्रीनीज बुकात नोंद झाली पाहिजे. - श्री. प्रकाश कर्डिले

    या एैतिहासिक पुण्यात तेली समाजाचा वेगळा ठसा आहे. मग तो कला, क्रिडा, समाजकारण या विविध क्षेत्रात उमटविलेला आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात, भगत, कर्पे यांनी स्वबळावर नगराध्यक्ष पद भुषविले आहे. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे यांनी समाजकारण व व्यवसायीक प्रगती मुळे रावसाहेब ही शासकीय पदवी मिळवली आहे. सर्कस वाले शेलार यांनी शेलार सर्कस जागतीक पातळीवर पोहचवली होती. त्यांचे भाचे दामु धोत्रे  हे तर सर्कस क्षेत्रात जागतीक पातळीवर होते. श्री. विलास कथुरे हे तर शासन मान्य कुस्ती पंच असून त्यांना शासनाचा दादोजी कोंडदेव हा पुरस्कार मिळाला आहे. घाटकर या मुलीने क्रिडा क्षेत्रात विक्रम घडविला आहे. तिन वेळा हिंद केसरी किताब मिळवणारे विजय चौधरी हे जरी खानदेशात जन्म घेतलेले होते तरी त्यांची कर्मभुमी पुणेच आहे. शेतीशास्त्र म्हणुन श्री. विनायक बावस्कर जे शास्त्रीय शोध लावले ती भुमी सुद्धा पुणेच आहे.

    पुण्याच्या इतिासात म्हणजे सांस्कृतीक, सामाजीक, शैक्षणीक क्षेत्रात नवा इतिहास रचन्याचे काम श्री. आबा बागुल यांनी केले आहे. हे आबाधीत सत्य समोर येते. श्री. आबांच्या पाठी मागे कोणताच भक्कम असा वसा नाही. लहान असताना अकस्मीत वडील वारले. खरी गरिबी त्यांच्या सभवती पिंगा घालत होती. याच गरिबीला सोबत ठेऊन ते लहानाचे मोठे झाले होते. अल्पशिक्षीत आबा गोर गरिबांची वस्ती असलेल्या शिवदर्शन चाळीत राहू लागले. शिवदर्शन, पर्वती दर्शन परिसर म्हणजे बहुजनातील गोर गरिबांची वसाहत. या वसाहतीतली प्रत्येक चुल ही कष्टावर पेटत होती. वेग वेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे वेग वेगळ्या भाषेचे हे लोक आपली रोजची भाकरी घामावर कमवत होते. उद्याचा उगवणारा सुर्य पहाण्यासाठी रात्री चाळीत विश्रांती घेत व सुखाला पाठीवर घेऊन राबत. आशा सामान्य जनात आबा लहानाचे मोठे झाले. गरिबी व गरिबांचे जगने मरणे किती असाह्य असते हे स्वत: अनुभवलेले आबा त्याच परिसरातील गणपती मंडळाचे अध्यक्ष झाले. दुसर्‍यांच्या वेदना जानून घेऊन, लोकसमुहात राहुन ती कमी करण्याचे संस्कार त्यांना संस्कारक्षम वयात मिळाले. आपल्या बरोबर जगणार्‍या जन माणसांची प्रश्नावली समजावुन घेण्याचा प्रश्न नव्हता तर ते जगने स्वत: जगत असल्या मुळे ते प्रश्न सोडवू लागले. सोबत स्वत:ची चुल कष्टावर चालविण्यासाठी त्यांनी उल्हास फॅब्रीकेशन हा छोटा वर्क्स शॉप सुरू केला. या कष्टावर घर चालत होते. घरा शेजारी असलेल्या झाडा जवळची लक्ष्मी माता श्रद्धा स्थान ते त्या जीर्ण मंदिरातील मातेचे दर्शन रोज घेत. मागने एकच मला शक्ती दे. मला सोबत दे माझ्या बरोबर असाहाय्य जीवन जगणार्‍या सर्वांचे जीवन बदलणारी शिल्पकार आहेस. तुझ्याच आशिर्वादाने तुझ्याच सहकार्याने हे सर्व बदलेल हा विश्वास होता ती आबांच्या जीवनातील पुंजी.

    हीच पुंजी सोबत घेऊन ते जनसमुदायात वावरत होते. 1992 चा ती जानेवारीचा ामहिना असावा. पुणे महानगर पालिकेची निवडणूक जाहिर झाली. ते अनेक प्रस्थापीत राजकीय पक्षांचे दरावाजे वाजवू लागले. अनेक प्रस्थापीत नेत्यांच्या घराचे उंबरठे झीजवले. मला उमेेदवारी घ्या विनंती केली. परंतू प्रत्येकाने त्यांना सरळ नकार दिला. एक तेली म्हणजे समाज व्यवस्थेला हा यातीहीन युवक दूसरे आसे गरिब कुंटूबातील युवक. लक्ष्मीमातेचे दर्शन घेऊन त्यांनी उमदेवारी फॉर्म भरला. फॉर्म भरणे सोपे होते पण जेंव्हा समोर पैशांचा डोंगर ज्यांच्या जवळ आहे असे रथी महाररथी समोर होते. तशाच व्यक्तींचा व समाजाच्या त्यांना पाठिंबा होता. निवडणुकी साठी अनेक झटत होते. आंबांच्या कडे ना पैसा व ना समाजाची संघटीत ताकद. निकाल ठरला होता. आबा पराभूत होणार कारण घरची भाकरी घाऊन लढणारे गोर गरीब कार्यकर्ते आंबांची सोबत होती. याच मंडळींनी धनदांडग्यांना घरात बसविण्यास सोबत दिली. अत्यंत चुरसीच्या निवडणूकीत आबा यशस्वी झाले. एक नव्या दमाचा स्वविचाराचा नगर सेवक पुणे महानगर पालिकेला मिळाल. ज्यांनी दरवाजे बंद केले होते त्या प्रस्थापीत पक्षाने व व्यक्तींनी त्यांना पायघड्या टाकल्या एवढे वास्तव आबांच्या बाबत घडलेले आहे. 

    आज पुण्याला सांस्कृतीक राजधानी म्हंटले जाते. पेशवे काळापासुन गणपतीला महत्व आले. भाऊ रंगारींनी घरात बंदिस्त ठेवलेला गणपती सार्वजनीक केला होता. परंतू गाव गाड्यातील देव दैवी ह्या कोपर्‍यातच होत्या. उदा. लक्ष्मीबाई, मरीआई यांचे भक्त व पुजारी हे त्याच समाजातील होते व असतात. तुळजाभवानी माते ठिकाणी मातंग समाजाला प्रथम स्थान आहे. ही यतीहिन समाजाची शक्ती देवता. आबांनी त्याच आपल्या यातीहिन देवतेला वंदन करून उमेदवारी अर्ज भरला होता. याच लक्ष्मीमातेचा जीर्णद्वाराचे काम हाती घेतले. नुसते काम हाती घेतले नाहीतर. दरवर्षी घटस्थापने पासून दसर्‍या पर्यंतच्या दहा दिवसाच्या काळात ते सांस्कृतीक कलांचा ते उत्तम संयोग साधून एक नव्या संस्कृतीला त्यांनी चालना दिली. हा उत्सव फक्त शिवदर्शन मधला न रहाता सुसंकृत पुण्याचा ठेवा तयार होऊन उभ्या महाराष्ट्रात फक्त आदर्श निर्माण करून बसला. कला व संस्कृतीचा नवा महामार्ग आंबांनी निर्माण केला. याला त्यांची लक्ष्मी माते वरील अपार श्रद्धा कारणीभुत आहे. तसेच त्यांच्यात दडलेला एक कलाकार ही आहे. स्वत: ते चांगले गायक ही आहेत जेंव्हा ते महोत्सवात स्वत: गातात तेंव्हा भक्त गण मंत्रमुग्ध होतात.

    परसिर कष्टकरी गरिबाचा मुलगा शिकला हेच भरपूर झाले. तो स्पर्धेत उतरला नाही तरी चालेल  त्यांने मिळालेल्या शिक्षणावर कुठे तरी कमवावे व जगावे व जगवावे ही एक माफक अपेक्षा. ही अपेक्षा आबांना मंजुर नाही त्यांनी आपला परिसरत तर पुण्यात अशी हजारो कुटूंब जी आहेत ती मुख्य प्रावाहा पासून दुर फेकलीत आशा रंजल्या गांजल्या समाजातुन शिवाजी घडावेत, आण्णाभाऊ साठे घडावेत, महात्मा फुले घडोत, क्षितीज कवेत पकडावेत हे एक ध्येय ठरविलेले होते. या घरातील मुले राष्ट्रीय, जागतीक पातळीवरील गेटच्या आत ही जावू शकत नाहीत. ही भयान वास्तवता असताना आबांना त्यांना घडवायचे होते. तळातील माणसाची घडन करावयाची होती. या साठी त्यांनी आपले एक शिक्षण सम्राट बनून पैशांच्या राशी कमवू शकले आसते. आज इतके शिक्षणाची दाहकता समोर आहे. त्यांची विचार धारा ही पैशात नव्हती समाजाला लुटणार्‍या आजच्या शिक्षण सम्राटाशी नव्हती. ही होती महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांच्या विचारांशी ते एक महात्मा फुुले यांचे विचार वंश होते. तसे विचारवंश असल्यामुळे दर्जेदार शिक्षण देणार्‍या राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय शिक्षण देणार्‍या शैक्षणिक संकुल सारखी शाळा काढण्यासाठी त्यांनी पुणे महानगर पालीकेस वेठीस धरले. ज्या शिवदर्शन परिसरात पुर्वी साधा इंग्रजी पेपर सहसा कोठे वाचत नव्हते. त्याच परिसरात स्व राजीव गांधी ई लरनींग स्कुल सुरू करावयास लावले. आज या शाळेत खडू फळा नाही. पुस्तक ही नाही. फक्त विद्यार्थी , शिक्षक, ंइंटरनेट आहे. या माध्यमातुन विद्यार्थी घडवीले जातात. भविष्यात गोर गरिबांची मुले सत्य, चारित्र्य, पिळवणुक प्रवत्तीस आळा. सेवा व त्याग या संस्काराने घडून देशाचे नेतृत्व करतील हा विश्वास व्यक्त करतात तेंव्हा त्यांना महात्मा फुुले यांचे विचारवंश म्हणुन इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. कारण ते शिक्षण सम्राट बनु शकलेअसते पण ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचार प्रणाली प्रमाणे वाट चालू लागले कारण या शाळेत ज्ञान ग्रहण करण्यासाठी वाशिला, पैसा द्यावा लागत नाही इथे उपलब्ध प्रवेश अर्जातुन लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जातो हे वैशिष्ठ आबांच्या विचार प्रणालीतून समोर येते तेंव्हा शिक्षणा विषयी तळमळ असलेला नतमस्तक होतो. कारण येथील मुलांना इलनींग मोफत नव्हे तर कपडे दोन वेळचे जेवण व न्याहरी सुद्धा मोफत मिळते.
    
    आबा हे सांस्कृतीक विचाराचे बैठक आहेत. लहानपणी संस्कारक्षम वयात वडील वारले होते. आईने पडता संसार अपार कष्ट घेऊन उभा केला. मुले व मुली यांना नुसते शिक्षण नाही तर संस्कार, विचार, आचाराची शिदोरी ही दिले. प्रमाणीक ही निष्टावंत व त्यागी ही विचार धारा दिली. आबा जसे घडत गेले तसे ते आपल्या बरोबर असलेल्या समाजाला ही घडवत गेलेत. ही वास्तवता समोर येते. पुणे महानगर पालिकेत स्पष्ट व तडफदार ही आपली प्रतीमा यातुनच तयार झाली. गरीबी व गरीब हा त्याचा कार्याचा केंद्र बिंदु गत 25 ते 30 वर्षात ढळला नाही आणी ढळू देत नाहीत. फकत आपण निवडूण येतो त्या वडॉचा पुणे शहराचा फक्त विचार त्यांनी केला नाही. दरवर्षी हजारो भाविकांना ते काशी तिर्थयात्रेला धेऊन जातात. येणारा भार ही ते बराच उचलतात. या यात्रेत ते एके नव्हे तर सर्व कुंटूंब समाील होते.  ज्येष्ठ नागरीकांना त्रास होणार नाही याची पहिली काळजी घेतात. त्याच बरोबर सर्व यात्रेकरूंना ते संभाळून नेहतात व आणतात. प्रवासात सर्व जन सोबती न रहता एक कुटूंब तयार होते. अनेक जाीती ची मंडळी कधी एकत्र होतात कधी एक होतात हेच बागुल कुटूंबा मुळे समजुन येत नाही. वारानशी व इतर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी पुण्याचे बागुल म्हणुन त्यांनी वेगळी प्रतिष्ठा मिळवलेली आहे. तेथील रहिवाशी सांगतात हा मोठ्या मनाचा माणुस वाराणाशीत जन्मास आला आसता तर वारानशी अजुन मोठी झाली आसती. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिना दिवशी वारणाशीत त्यांनी तिरंगा यात्रेकरूकडे देऊन दोन किलोमिटरचा लाँग मार्च ही केला होता. एका वर्ष ते यात्रेला यात्रेकरूंना घेऊन गेले होते. वाटेतच फोन आला आई नलिनीताई वारल्या आबांनी शांत पणे संबंधीत कार्यकर्त्याना सुचना दिल्या सर्व सोईदिल्या व यात्रा न थांबता ते पुण्याकडे निघताना सर्वांना सांगीतली तुमची काशी यात्रा पुर्ण झाली तरच आईला समाधान मिळेल कारण यात्रा  सर्वांना घडोत ही आईची इच्छा आहे.

    श्री. आबा बागुल हे सलग 30 वर्ष पुणे महानगर पालीकेचे सदस्य आहेत. आबा तेली समाजात जन्म घेतलेले आहेत. आबा हे यातीहिन वर्गातील आहेत. ओबीसी आरक्षण जीवनाचे अनेक पैलू मला समजु लागले. त्या पैलु पासुन मी समाजजीवनात बराच माझ्यात बदल करू शकलो पक्षाबरोबर एक निष्ठाता पहिली. पण समविचारी जी जी मंडळी इतर पक्षात आहेत त्यांना आपले मानने ही त्यांची वाटचाल आसते. आबा अपक्ष निवडून आले. काँग्रेस पक्षात सामील झाले. पक्षाचा खंदा पुरस्कृता ही त्यांची वरिष्ठा पर्यंत खरी ओळख यातुनच महापालीकेत काँग्रेस पक्षाचे गट नेते म्हणुन काम करू शकले. स्थायी समीती सारख्या जबाबदार पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुणे महानगर पालीकेचे उपमहापौर म्हणुन त्यांना शहराचा विकास करण्यास काँग्रेस पक्षाने लावले. पुणे महानगर पालीकेत अनेक वेळा काँग्रेस पक्ष अडचणीत आला. भले भले एका रात्रीत पक्षांतर करून मानाच्या लाभाच्या जागेवर बसले. पण आबा मान व लाभ या पेक्षा पक्ष निष्ठा मोठी मानुन समाज विकास हाच माझा कॉग्रेस पक्ष मानुन कार्यरत राहिले. 

    श्री. आबा बागुल यांनी कधीच लपवून ठेवले नाही. परवा परवा तेली समाजाच्या कार्यक्रमात सौ. जयश्री बागुल या मराठा कुटूंबात जन्मलेल्या आहेत. परंतू आपल्या उच्चजातीचे मोठे पणा कडे पाठ करून यतिहीन आशा तेली समाजाच्या झाल्या नव्हे तर सर्व मागास समाज उच्चवर्णीय झाला पाहिजे या साठी त्या झटतात. आणी त्यांच्या या ध्येवादाला गोंडस फळे ही आलीत हे ही मान्य करावे लागेल. त्या एक सावित्रीबाई फुल्यांच्या विचारवंश बनल्यात हे यांचे मोठे पण विसरता येणार नाही. कारण अनेक धोरणांचात्या आंबांच्या बरोबर पाठपुरावा सातत्याने करतात.

    उच्चजातींनी केलेली आपली जात पडताळणी श्री. आबांनी 1992 मध्ये प्रथम प्रथम पायदळी तुडवली. जशी श्री. . संत संताजींनी श्री. तुकारामांना दिलेली रामेश्वर भटाची पडताळणीची शिक्षा पायदळी तुडवली अगदी तशी त्यांनी तुडवली व पुणे शहराला ओरडून सांगीतले पुणे हे छ. शिवराय महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे समतेचे शहर आहे. यातीहिनतेची जात पडताळणी पाला पाचोळा केला. मी जन्मानने तेली आहे याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. आळंदीच्या रस्त्यावर श्री. संत संताजींचा पुतळा उभारण्याची त्यांची मागणी ते महापालीकेत लावुन धरत होते. पण त्याच वेळी शासनाच्या निर्णय जाहिर झाला की सार्वजनीक ठिकाणी पुतळे नकोत. पण आबा जाती निष्ठेपासुन दुर गेले नाहीत काही गरिब घरातील बांधवांना महापालीकेत नोकरीस लावु शकले. श्री. लक्ष्मी मातेच्या मंदिरा जवळ शासकीय जागेत त्यांनी वसंतराव बागुल हे उद्यान उभे केले. मी वर म्हंटले की आबा हे कला रसिक आहेत. याच उद्यानात त्यांनी भिमसेन जोशी कलादान सुरू केलेले आहे. दादासाहेब फाळके थ्रीडी थेटर सुरू करून पुणे शहराला एक नवा आशय दिला. आबांच्या अंतकरणात समाज निष्ठा होती म्हणुन त्यांनी विस्कळीत झालेला समाज एकत्र यावा विकासाची दिशा मिळावी म्हणुन 2002 साली लक्ष्मी माता मंदिरा समोर तेली समाजाचा कुटूंब परिचय मेळावा घेतला. या मेळाव्याला किमान 10 ते 5 हजार समाज उपस्थीत होते. यातून समाजाला नवी दिशा मिळाली हे वास्तव समाजाने अनुभवलेले आहे.

    श्री. संत तुकारामाचे लेखनीक, संत तुकारामांचे सहकारी एवढे नव्हे तर संत तुकारामांची सामाजीक क्रांती शेकडो वर्ष जीवंत कारणीभूत ठेवणारे श्री संत संताजी आहेत. या महान व्यक्ती घडाव्यात. या संत विचारावर निष्ठा ठेऊन जेजे परिवर्तन करतात आशा संत संताजी पुरस्कार महापालीकेने द्यावा या साठी पाठ पुरावा केला. याच मुळे महापालीकेच्या एैतिहासिक ठरावाने हा पुरस्कार सुरू झाला. या भव्य दिव्य कार्यासाठी महापालीकेला दर वर्षी पाच लाख खर्च करावे लागतात. या वर्षीचा पुरस्कार श्री. संत तुकारामांचे वंशज श्री. सदानंद मोरे यांच्या हास्ते श्री. उल्हास दादा पवार मा. आमदार यांना देण्यात आला.

    श्री. आबा उर्फ उल्हास वसंतराव बागुल यांची शुन्याची वाटचाल पहिल्या नंतर त्यांना आमदारकी, मंत्री पद मिळावायास पाहिजे होते. पण ते ज्या समाजचेे आहेत त्या समाजाच्या शिक्या मुळे आज पर्यत शक्य झाले नाही. पण भविष्यात ही यातीहिनता पायदळी तुडवतील हे वास्तव कुणीच विसरू नये. कारण त्यांच्या कार्याची नोंद ग्रीनीज बुकात ठेवावी लागणारा आहे. 
शब्दांकन - मोहन देशमाने

copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com