समाजाचा स्वाभिमान आभिमान श्री. आबा बागुल  

    - रमेश भोज,  मा. विश्वस्त तेली  समाज  पुणे व ओबीसी सेवा सं, पुणे जि. अध्यक्ष

    श्री. आबा बागुल यांचा माझा परिचय तेली समाजाचा विश्वस्त म्हणुन झाला. त्यांची कार्यपद्धती जवळुन पहाता आली. उच्च पदावर जावून सुद्धा तुम्ही माझे अहात मी तुमचा आहे. ही भुमीका ते घेऊन वावरताना पहाता आले. कोथरूड समाज संस्था माध्यमातुन अनेक उपक्रम राबविताना श्री. आबांच्या संपर्कात रहाता आले. समाज उपयोगी कामात त्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. इतर मागास वर्गासाठी आरक्षणाची व्यवस्था नव्हती त्या वेळी आबा खुल्या प्रवर्गातुन धन दांडग्यांच्या विरोधात उभे राहुन प्रथम 1992 ला विजयी झाले. आबांची राजकीश वाटचाल पाहिली तर लक्षात येते की आबा कोणाच्या मेहरबानीने पक्षाच्या कुबड्या घेऊन सातत्याने विजयी झालेले नाहीत. ते विजयी झालेत आपल्या ताकदीवर आबांचे शिक्षण फार मोठे नाही. त्यांना बुद्धीमत्ता होती पण परस्त्थीती आडवी आली होती. बुद्धीमत्तेची कसोटी नेहमीच शालेय शिक्षणावर लावता येत नाही. श्री संत तुकाराम कोणत्या शाळेत गेले होते. घरीच लिहीता वाचता शिकले परंतू एका एका अभंगावर पीएचडी सारखी पदवी मिळू शकते  इतकी प्रखर बुद्धीमत्ता होती. तीच अवस्था श्री संत संताजींची आहे. रस्त्यावरचा हा प्रचंड बुद्धीमत्तेचा बांधव आहेत याचा अभिमान जरूर होतो. ही त्यांच्या कार्याची दिशा आहे. असा हे वर म्हंटल्या प्रमाणे खुल्या जागेत व राखीव जागेत ही स्वत:च्या ताकदीवर निवडून येतात. आज अबाधीत असलेल्या सत्तेतील समाज बांधव जात व धनदांडगाईवर खर्‍या सोशित समाजावर अन्याय करून ग्रा. पं. ते नगर सेवक व महापौर होत आहेत. परंतू आबांच्याकडे पाहिल्या नंतर एक सत्य समोर येते. आबा हे ओबीसी असुन ही त्यांच्या विरोधात असा बनावट उभा रहाताना शंभर वेळा विचार करतो. हीच आबांची गरिब माणसाच्या विकासाची वाटचाल आहे.

    शिवदर्शन पर्वतीदर्शन ही वसाहती या मुळात 1962 च्या पुरग्रस्तांच्या सर्व कुटूंबे ही 1962 ला उघड्यावर आलेली. पुरग्रस्त छावण्यात काही वर्ष राहिलेली. या ठिकाणी गरिबी व वेदना पोसलेल्या. त्यांवर मात करण्यासाठी श्री लक्ष्मी मातेवर श्रद्धा व भक्ती ठेवून आबा राहिले व त्यांनी खर्‍या अर्थाने आपला वार्ड स्मार्ट केला आहे.

    जातीत व पातीत उभे राहून समाज विकास म्हणावा तसा होऊ शकत नाही. या परिघा बाहेर जावुन आपल्या काम करावयाचे आहे या साठी त्यांनी जाती पातीची बंधने स्वत:पासून तोडली व ते गरिब व मध्यम वर्गीय केंद्र बिंदू मानून काम करू लागले हे वास्तव ही आहे. पण ती सुद्धा मी किती ही मोठा झालो तरी माझी जात ही माझीच आहे. मी उच्चपदावर जरी गेलो असलो तरी मला सर्वाबरोबर समाजाची जाणीव ठेवावीच लागेल त्यांनी लक्ष्मीमाता मंदिर परिसरात कै. वसंतराव बागुल उद्यान उभे केले. याच परिसरात सुंंदर असे कला दालन, थ्री डी थेटर ही सुरू केले. श्री. संत संताजींना पहिला न्याय त्यांनीच दिला त्यांच्या मुळे पुणे महानगर पालीकेला दर वर्षी पाच लाख खर्च करून श्री संत संताजी पुरस्कार देण्याचा आरंभ करावा लागला आहे.

    त्यांच्याच मार्गदर्शनामुळे 2000 मध्ये उपनगरात स्थायीक झालेल्या बांधवांना संधी मिळाली. आठरा गावची मंडळी कामधंद्याला पुण्यात आली ही एक एकटी जगणारी कुटूंब चार नाते वाईका पेक्षा कुठेच परिचीत नव्हती. प्रथम इथे पहिला कुटूंब परिचय मेळावा यशस्वी पणे झाला. यातुन हजारो कुटूंबे खर्‍या अर्थाने पुणेकर झाली  त्यांचा परिचय झाला विचाराची देवाण घेवाण झाली मी पुण्यात एकटा नाही तर इथे माझी हजारो कुटूंबे आहेत ही खरी ओळख झाली.
    श्री. आबांना सर्व तेली समाजा तर्फे ओबीसी सेवा संघा तर्फे हार्दिक शुभेच्छा.

दिनांक 13-09-2017 21:39:26
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com