वारकरी संप्रदायातील सूर्य - संताजी

Sant Santaji Maharaj Jaganade Eka Yoddha

     खरे तर वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शोष्णाच्या विरूद्ध एल्गार म्हणून होती. मनुवादी संस्कुतीची जोखडे तोडण्यास्तव केलेला प्रबोधनस्वरूपी किर्तनाचा जागर होता. धर्ममार्तंडांच्या जोखडातून भेाळया भाबडया अज्ञानी निरक्षर पिडलेल्या रयतेला मुक्तकरण्यासाठी चालविलेले ते मानवमुक्तीचे शांत व संयमी असे आंदोलन होते.याच वारकरी संप्रदायातील सूर्य म्हणून संताजी जगनाडे महाराजांचे नाव येते. एक क्रातीकारी पाऊल उचलणारे लढवय्येे योदधे  म्हणून त्यांचे नाव शिल्पात कोरावयास हवे आहे.

     महाराष्ट्राच नव्हे तर समग्र भारतभू ही संताची भूमी आहे. जो मनाची सहजता चराचरात अनुभवतो व मानवतेच्या दुष्टीने निरामय असे रयतेप्रती लोककल्याणकारी कार्य करतो ते सर्व संत या उक्तीत मोडतात. संताला सत्याची कास असून असत्याचा नायनाट करणे हेच ध्येय असते. या उदिष्टातूनच संताजीच्या जीवनकार्याची महती आम्ही समजून घ्यायला  हवी. मात्र आमचा वारकरी हा स्वअस्तित्वाचे पदचिन्ह विसरला तर नाही ना असा प्रश्नही आमच्या मनात येत असते.

    संताना जाती जातीत अडकवून त्यांच्या कार्यकतुत्वाला आज बांधल्या गेल्याचे दिसून येते आहे. संत हे कुठल्याही जातीचे वा पंथाचे नसून ते समस्त रयतेचे लोकनेते होते याअनुषंगानेच  सर्वांनी समग्र संत विचाराला आपल्या  कल्याणाचा मार्गदाता म्हणून एक स्विकार सोहळा  आयोजीत केला तेा स्विकार सोहळा पंढरपूर या भूवर गावागावातून जागर करीत जातो हीच ती वारी होय. वारकरी संप्रदायाची ती वारी होय.

   संत तुकारामांचा एक लेखनिक या हेतूनेच संताजीकडे बघितले जाते. परंतु  तुकारामांचे लेखनिक ही संताजीला लावलेली बिररूदावली योग्य नव्हे. संताजी हे तुकारामाचे सहकारी असले तरी तुकारामापेक्षाही संताजीचे आयुष्यमान हे दीर्घ होते. म्हणजेच 8 डिसेंबर 1624 ते 20 डिसेंबर 1699 असे 76 वर्षाचे आयुष्य याचा विचार करू जाता खरे तर संतमंदियाळीत आणि वारकरी संप्रदायात संताजीचे कार्य हे जवळपास 53 वर्षे अबाधीत  सुरू होते. त्यामुळ त्यांच्या आयुष्यातील या क्षणात तुकाराम महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेवून किती महत्तम कार्य केले असेल यांची तुलना करण्याची आज गरज आहे. मात्र इथल्या व्यवस्थेने त्यांच्या स्थानालाच संपविले याला जबाबदार इथली जातीव्यवस्था व धर्मव्यवस्था होय. संताजीकडे बघण्याचा द़ुष्टीकोण संकुचित तेवढाच नकारात्मकतेचा ठेवू नये. कारण याप्रकारचा दुष्टिकोण आम्ही कित्येक मंच प्रसंगी अनुभवलेला आहे. तुकारामांची अभंगगाथा जर एवढी भली मोठी असेल तर संताजीची गाथा ही त्याही तुलनेत दर्धिकाला अनुमानानुसार प्रचंड मोठी होती यात शंका घेण्याचे काही कारण नाही. मात्र पुढिल जातीव्यवस्थेतील राजेपद्धतीच्या पेशवाई अनुयायांनी खरे तर त्यांचे समग्र चरित्र व त्यांचे अभंग कोटच नष्ठ केले हे नाकारताही येणारे नाही. तरी मात्र तुकाराम महाराजांची विचारधारा अस्तित्वात असलेली अभंग रचना यावरून संताजीची विचारधारा एकच होती हे निक्षुण मांडता येते. अर्थातच संताजी हे चमतकर व अंधश्रद्रधा देवदैवंवाद यापासून कोसो दूर होते, नव्हे तर ते मानवभक्तीलाच ईशभकती समजून विठोबाच्या चरणांशी लिन होत या समग्र मनुसंस़्कुतीला लाथाडणारे कर्ते सुधारक होते हे समजून घ्यायला हवे. संताजीने तुकाराम महाराजांची अभंगगाथा पुनश्च लिहून काढली म्हणजे काय तर तुकारामांच्या अभंगवह्या इंद्रायणीत मंबाभट व रामेश्वर भट सहकारर्यानी बुडविल्या अर्थात् त्यांना मनुनियमाने शिक्षाच फर्मावली होती. आम्ही पोटच्या लेकराला स्वतः फेकणार काय.  तसेच महाराजांच्या अभंगाचेही आहे. ते त्यांनी स्वतः शिक्षेमुळे टाकले नसून ते या भटांनी स्वतः पुरलेले आहे. मात्र याप्रसंगी तुकाराममहाराज निराश झालेले असून त्यांनी अन्नत्याग केला होता. त्यांचे जगणे कठीण झाले होते. म्हणून संताजीने त्यांना तोंडपाठ असलेले अभंग पुनश्च लिहून काढलेत, गावागावत फिरून  विठूभक्ताकडून ते वदवून घेत संकलीत केलेत या द़ुष्ठीने या क्रांतीला  त्यांनी जाणून बुजून  विचारांती सत्यास उतरविले ही एक फार मोठी क्रांती होती. जगाच्या विरूद्ध मनुनियमाच्या विरोधात रामेश्वर, मंबा भटांच्या मनमेंदूला मस्तकाला लाथाडून वर्णवर्चस्ववादी विचाराला दिलेली सर्वात मोठी तिलांजली होती. अर्थातच संताजीची भूमिका समाजसापेक्षतेने केलेली जाणूनबूजूनची क्रांती होती कारण यातच रयतेचे हीत दडलेले होते. यात मानवतेचा वंदनिय स्विकार सोहळा दडला होता. या मनूवाद्यांना सर्वात मोठी चपराक मिळणार होती. आज ही अभंगगाथा नसती तर तुकाराम महाराजांचे नावच काय तर एवढया प्रचंड विचारांचा तेज आपण अनुभवला नसता. त्या अनुषंगानेच संताजी हे वारकरी संर्पदायातील सूर्य ठरतात की ज्यांनी या भूवर या सूर्यतेजाची किरणशलाका तुकारामांच्या वाणी रूपी शब्दांच्या  धारेतून आम्हास अनुभवायास दिलेली आहे.

   आज वारकरीच नव्हे तर समग्र समाजाने या समग्र क्रांतीकडे डोळसतेने बघायला हवे. संताचा वापर समाजाला एकत्र आणून आपल्या स्वार्थी संत्ताध खुर्च्यावर स्थानापन्न होण्यास्तव आज केला जातो. मात्र संताजी तुकारामांच्या विचारांचा आदर्श न स्विकारता फक्त त्यांच्या पाठीमागे चमत्कारांच्या छटा दर्शवून पुनश्च धर्मक्रातीचा माहोल तयार होतो आहे. सावध व्हा रे, सावध व्हा रे, माझ्या जातीच्या तेल्यांनो, सखल जनांनो सावध व्हारे संताजीच्या अभंगाचा मतितार्थ आज समजून घ्यायला हवा. आम्हाला खरा वारकरी कळायला हवा. या दुनियेतील लबाडांचा पसारा आणि खोटारडे धर्मसोंगे कुठली ते ओळखून खरी संकटे आज कालामानानुरूप कुठली हे ओळखता न येत आम्ही सजग झालो नाही तर जीवनांच्या अंती ज्या संतपुरूषाचे  नाव घ्यावे त्या संतमहात्म्यांना आम्ही  काय दिले हा प्रश्न  निरूत्तरीत करणारा असेल. अर्थात आमूची वारी कुठल्या कामी आली काय हेही तपासून घ्यायला हवे. खरे तर वारकरी संप्रदायाने भागवतधर्माचा पाया रचला या पायाचे श्रेष्ठत्व  संत नामदेवाकडे जाते, नामदेवे रचला पाया तुका संताजी झालासे कळस हेच योग्य होय. भागवतधर्म हा पाली भाषेतील शब्द समान वाटणी समानता हा अर्थ घेवून येतो. वारकरी म्हणजेच अन्याय अत्याचार अनिष्ठ परंपरा रूढी मनुव्यवस्था चमत्कार अज्ञान निरक्षरता यावर शब्दरूपी शस्त्रांचा वार करून रयतेचे हित जोपासणारा वारकरी होय.. अर्थात समताधिष्ठीत समाज निर्मितीचे ध्येय उराशी बाळगणरा प्रेम शांती सत्य अहिंसा तत्वे रूजवणे हाच वारकरी संप्रदायाचा मुळ हेतू आणि या हेतुनेच निश्स्त्राधारी पंढरपुरचा विठोबा विठूराया हा आपले दैवत ठरवलेला आहे.

    संत तुकडोजी महाराज म्हणतात, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर या संदर्भानुरूप आणि संत तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू  या अभंग अर्थानुरूप वारकरी क्रांती ही नि शस्त्र क्रांती होती ती बुद्धत्व ज्ञानमार्गाची अधोरेखीत क्रांती होती हेही आपण समजून घ्यायला हवे.   उच्च- निच, श्रेष्ठ - कनिष्ठ, स्पूश्य -अपूष्य असा भेदाभेद मानवाला मिळणारी हीन जनावरासारखी वागणूक मन देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुखी होता बुडती हे जन न देखवे डोळा, येतसे हिताचा कळवळा म्हणोनि म या अर्थानुरूप नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणीत संतानी या भूवर जे युद्ध पेरले  ते वैचारिक क्रांतीचे नि शस्त्र  युद्ध होते प्रस्थापित व्यवस्थेला गाडणारे ते तत्वज्ञान होते. विष्मतेच्या विरोधातील ते आंदेालन होते. कर्मकांड प्रायश्चित तीर्थयात्रा दान दक्षिणा पूजा अर्चा अनुष्ठान व्रते यज्ञयाग यातील कुसंगाला नाकारणारे एक क्रांतीपर्व होते. आज या क्रांतीपर्वाचे स्मरण करणारा कूतज्ञतापूर्वक सोहळा म्हणजेच ही विठूभक्तांची वारी तत्वाज्ञानाला समजून घेत या संतमंदियाळीतील तुकाराम व संताजी जगनाउे महाराजांच्या विचाराला नतमस्तक होत असेल तर खरेच इथल्या बहुजन रयतेचे तेच अच्छे  दिन येतील. अन्यथा खरे मार्ग प्रस्थ ज्ञान उमजून न घेता आम्ही  प्रतिक्रांतीच्या मनुवादाला चिपकलेले राहिलोत तर उदया याच संतसूर्याचा प्रकाश आपणास न दिसता अंधाराच्या पखाली जीवनात आपणच घेवून आलोत असे समजण्यास हरकत नसेल तुर्तास एवढेच........... जय संताजी ....

    (संजय येरणे वार्ड नं 6 मु पो त नागभीड जि चंद्रपर मो 9404121098 लेखक हे संताजी जगनाउे एक योद्धा या संताजी चरित्रात्मक कांदबरीचे लेखक असून आजतायागत त्यांची 15 पुस्तके प्रकाशित आहेत. संत साहित्य, धर्म तथा मानवतावादी मूलयांचे अभ्यासक शिक्षणातील संशोधक समीक्षक कवी कथाकार वक्ते वूत्तपत्रलेखक आहेत. त्यांना साहित्य क्षेेत्रातील कथा कादंबरी समीक्षेला अनेक संस्थात्मक राज्यपुरस्कार प्राप्त आहेत.)

दिनांक 05-07-2017 23:05:15
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com