तेली समाजातील श्रेष्ठ व्यापारी म्हणजे श्री. शंकरराव नवपुते

    तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते. या दुष्काळा मुळे आडत व्यापारी डबघाईला आला. वडिलांनी नोकरी पत्करली त्या शिवाय घर चालणार नव्हते. या महा भयंकर दुषकाळात अनेक कुटूंबे चक्रात आडकली. काहींनी कुटूंबासह  अन्नपाण्यासाठी स्थलांतर केलेे. काही तग धरूण होती. झळ सहन करणे अशक्य होत होते तेंव्हा आनंदरावांनी विचार केला बोधेगावचे जावई श्री. ताराचंद देवराय यांच्याकडे मुलगा पाठवावा. निदान पुण्यात स्थीर होऊ पहाणार्‍या देवरायांना विचार पटला व श्री. शंकरराव आनंदराव नवपुते पुण्याच्या गणेश पेठेत दाखल झाले.

    त्यावेळची गणेश पेठ ही देशातील अग्रेसर बाजार पेठ होती. गुलटेकडी मार्केट यार्ड या ठिकाणी माळच होता. या गणेश पेठेत शंकरराव आले. देवरायांनी हा मिसरूड न फुटलेला पोरगा प्रविण मसाले वालेकडे घेऊन गेले. स्वत: त्या ठिकाणी प्रमाणिक पणे काम करित असल्याने त्यांनी विश्वास संपादन केला होताच. तेंव्हा मिसरूड ही न फटलेला हा मुलगा त्यांनी कामाला ठेवला. भवानी पेठेत प्रविण मसाले वाल्या चोरडीयांचे भुसार मालाचे आडत दुकान होते. तशी सर्व भवानी पेठ ही वेगवेगळ्या मालाची आडतीची व होलसेलची दुकाने. या दुकानाचे मालक जवळ जवळ सर्व मारवाडीच आगदी मिठा पासून साखरे पर्यंत होलसेल व्यवसाय करणारी ही मारवाडी मंडळी मालाची पारख, धंद्यातील चढ उताराचे अंदाज. खरेदीचे तंत्र, विक्रीचे तंत्र, भांडवल व गुंतवणूक खर्च करण्याची माणसीकता धंद्यातील भाषा गिर्‍हाईक संभाळणे. काम करूण घेण्याची पद्धत हे सर्व बारकावे उमेदीच्या काळात शंकरराव येथे शिकले. जीवनाचे शिक्षण तेच खरे जीवन घडवू शकते. इथे शिक्षक असतात ते फकत अनुभव. यातून जो उभा रहातो तोच यशस्वी होतो. शंकरराव रात्र शाळेत दाखल झाल्यावर गणेश पेठेत देवरायाकडे सकाळ संध्याकळ जेवण करावयास जात बाकी वेळ दुकानात रात्री याच दुकानाच्या कप्यावर झोपावे. सकाळी उठून तेथेच नळावर अंगोळ करून पुन्हा कामाला लागावे हा दिन क्रम सुरू केला. भवानी पेठेतुन होलसेल मार्केट गुलटेकडी परिसरात गेले. एक जूनी सायकल विकत घेतली पायंडल मारित गणेश पेठ ते गुलटेकडी प्रवास सुरू झाल बँकेत चेक जमा करणे उधारी गोळा करणे. हे करित असताना गणेश पेठेतून जेवनाचे डबे घेऊन येणे या सर्व गोष्टीत ते बारकावे शिकू लागले. आपले शिक्षण 9 वी पास किमान दहावी तरी शिकावे म्हणनु ते बाजीराव रोडवरच्या रात्रीच्या शाळेत कामे संपताच जावू लागले वेळ मिळाला तर अभ्यास पण शाळा चुकवली नाही याच मुळे रात्र शाळेत बारावी पर्यंत शिक्षण घेऊ शकले.

    या पुण्याच्या गणेश पेठेत, भवानी पेठेत व गुलटेकडी मार्केट मध्ये वावरतात संभाषण करीताना मराठवाड्यातील भाषेचा वावर समोरच्याला चटकण समजे. मग या पुणेरी मातीत मिसळताना त्यांनी आपल्या भाषेतील बदल हा सहज करीत गेले आणि ते पुणेकर झाले. पुणेकर होणे सोपे होते. परंतु मारवाडी समाजात राहुन त्यांच्या सारखे व्यवहार चतुर होणे तसे सहज शक्य नव्हते. परंतू 1972 मध्ये पुण्यात दुषकाळ पाठीवर घेऊन आलेले शंकरराव व्यवहारात चतुर झाले. आर्थिक व्यवहार व व्यवसाय ते चांगले संभाळू लागले. एक हुशार व्यवहार दक्ष, निरव्यसनी तरूण ही जाणीव चोरडीयांना झाली. चोरडीयांची प्रविण मसाला कंपनी हाडपसर येथे होती. या कंपनीच्या कॉशियर पदी नेमणूक झाली. नेमणूक झाल्या नंतर लक्षात आले हे अधीकारपणाचे पद जबाबदारीचे आहे. रोज मोठा आर्थीक व्यवहार संभाळावा लागे. गोळा झालेली रक्कम बँकेत जमा करणे. मालकी भागीदारांची त्या पाच ही मालकांना संभाळणे. ही कला ते शिकले. या अधीकार पदावर काम करीताना व्यवसाय गणीते जवळ येऊ लागली. हे संभाळता संभाळताच स्वत:चा वहातूक व्यवसाय त्यांनी सुरू केला. या व्यवसायाला गुलटेकडी परिसरात व्यवसायीक संबंध असल्याने जम बसला विक्री पेक्षा उत्पादनात जास्त नफा मिळू शकतो हे ही त्यांच्या लक्षात इथेच आले. म्हणून येथे वेळु जागा खरेदी करून तेथे सोनपापडी या खाऊ पदार्थाची निर्मीती सुरू केली. जवळ जवळ 50 कामगार माल निर्मीती व विक्री ते पाहू लागले. सकाळी 9 ते 6 नोकरी ती करीत असताना वहातुक व सोनपापडी निर्मीती व विक्री पाहू लागले. याच जोडीला सायंकाळी सहा नंतर पिग्मी व भवानी पेठेत काम करीत होते. आणी नोंद ठेवावी बाब अशी की त्यांची व्यवसायीक हुशारी पाहुन बँक ही त्यांना नोकरी देऊ पहात होती. पण शेवटी त्यांनीच नकार  ही देऊ केला. थोड्याच दिवसात त्यांची बदली शिरवळ येथे झाली. फुड प्रोसेसींग ही कंपनी उभी केली जात होती. बांधकामापासून इतर स्वत:च्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. समाज कार्याशी ते सामील झाले. तिळवण तेली समजा तर्फे होणार्‍या कार्यात ते सहभागी असत. पालखी सोहळ्यात सामील असत. त्यामुळे कै. नंदुशेठ क्षिरसागर यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या निवडणूकीत श्री. गणेशशेठ व्हावळ, श्री. बाळासाहेब अंबिके, वसंतराव जाधव, ताराचंद देवराय, सौ. प्रिया महिंद्रे, सौ. वैशाली उबाळे यांच्या बरोबर चुरसीच्या निवडणुकीस सामोरे गेले होते. पालखी सोहळ्यात देवरायांचे योगदान मोठे होते. त्यामुळे श्री. मेरूकर वकील कै. माधव अंबिके यांचा परिचय जवळून झाला. त्यामुळे जेथे कोण जेवन देण्यास मिळत नसे तेथे त्यांनी जेवण देण्यास सुरूवात केली. पुण्यात पालखी येते त्या दिवशी  ते जेवण देत होते. परंतू विश्वस्तांच्या विनंतीस मान देऊन दुसर्‍या दिवशी जेवन देतात. 1972 च्या दुष्काळाने समाज जिवनात फार मोठा बदलाचा प्रारंभ झाला. गरिबी, पैसा याची नवी ओळख याच काळात घडली. कवळ्या मनावर शंकररावांच्या ती बिंबवली होतीच. स्वत: जो खंबीर उभा असतो तोच इतरांना घडवीत असतो हे स्व केंद्रित न रहाता आपल्या मनावर कोंदण केलेल्या बाबीवर लक्ष देत होते. यातुनच मार्केट परिसरातील गरिब, छोटे व्यापारी यांना रहाण्यास सहकार्य हि केले व आज ही करित आहेत. एक पतसंस्था उभी करून.  

    भवानी पेठेतील चोरडीयांच्या भुसार दुकानात काम करून जरी सुरूवात केली असली तरी थोड्या काळात ते खंबीर उभे राहिले. नोकरी मग ती खाजगी असो किंवा शासकीय ती फक्त जगवू शकते. पण व्यवसाय हा आपल्या धोरणाने ती गणीते पक्की करून केला तर आपन कुठे होतो कुठे आहे हे समजुन येईल आणी हीच बाब त्यांनी नोकरी करीत मरावाडी समाजा जवळून शिकून घेतली म्हणून शिरवळ येथील नोकरी सोडताच बिबवेवाडीच्या वसंत बाग चौकात समर्थ झेरॉक्स हे दुकान सुरू केले. जवळच नोंदणी कार्यालय. आनेक वकील मंडळींचा जवळचा सबंध त्यामुळे याही व्यवसायात ते आघाडी घेऊन काम करीत आहेत. सौ. सुनंदा शंकरराव नवपुते. यांचे माहेर नगरच्या तेली खुंटावरचे कै. अंबदास सैंदर यांच्या कन्या घरात व्यवसायाचे बाळकटू त्यामुळे त्या नवपुते यांच्या घराचा उंबरठा ओलंडताच खांद्याला खांदा देवून राबू लागल्या शंकररावांना 3 मुली 1) दहितुले (सातारा), 2) देशमुख चौधरी (नागपूर) 3) वाघमारे या तीन मुली या नुसत्या शिक्षीत नव्हे तर उच्चशिक्षित आहेत. कु. अदित्य हा मुलगा इंजीनीयर आहे. शिक्षण पूर्ण होताच हुशार म्हणून कंपनीने निवड केली. एक वर्ष दुबई येथे नोकरी ही केली. परंतू नोकरी नकोच हेच ज्ञान आपन व्यवसायात गुंतव या मुळे एक पार्टनर घेतला. या पार्टनर बरोबर  गुलटेकडी मार्केट मध्ये व दुबई येथे कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपनी मार्फत उत्पादन माल निर्यात व आयात सुरू केली. आज कु. अदित्य आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवुन आहे. 

    श्री. शंकरराव आनंदराव नवपुते या समाज बांधवाची झेप पहिल्या नंतर एक जाणवते. नोकरी कोणतीही आसो ती कनिष्ठच श्रेष्ठ व्यापार.

दिनांक 05-07-2017 19:24:31
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com