Responsive Header Nav
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com

सदा मांगाचे पोर, संत संताजी व संत रामदास

संत संताजींच्या मारेकर्‍यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 3) मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    वरिल तीन नावे वाचल्या नंतर जरा वेगळेच वाटले असणार. हे तिघे ही एकाच काळातील. मी तेली आहे. माझे पुर्वज तेली होते. माझ्या नंतरचा वशंज तेली असणार आहे. त्यामुळे या व्यवस्थे विरोधात मी लढणार आणी मी लढून या व्यवस्थेला संपवणार ही ध्येय संताजींची होती. आणि म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्मानुसार किंवा ब्राम्हण कायद्याप्रमाणे व मुसलीम सत्तेत अधीकार पदावर राहून संत तुकारामांना शिक्षा दिली. या शिक्षेला अपील नव्हती. या शिक्षेला मुसलीम सत्ता ढवळा ढवळ करीत नव्हती तर ब्राह्मणी सरदारांना उलट संरक्षण देत होती. आशा वेळी हा ब्राह्मणी कायदा मोडायचा ठरवला तो प्रथम इतिहासात संत संताजींनी. महात्मा गांधीच्या कायदेभंग चळवळी पुर्वी शेकडो वर्ष पुर्वी संताजींने अहिंसेने सनदशिर मार्गाने ब्राह्मणी धर्माचे कायदे त्यांचे कायदे देणारी पुस्तके म्हणजे, मनुस्मृती, ब्राह्मण्य पायदळी तुडवली. आशा या क्रांती काराला त्यांनी शिक्षा देण्या साठी वेगळे मार्ग निर्माण केली. ब्राम्हणी न्यायपीठावर बसलेल्या रामेश्वर भट तुुकारामा जवळ येतो सामील होतो. समता स्विकरतो. इथे तुकारामचीं संत संताजींची फसगत झाली ब्राह्मण्य हे नेहमी ब्राम्हण्य आसते. ते अडचनीच्या वेळेस नेहमी चार पावले मागे सरते. आपल्या नांग्य पोटात ठेवते आणी विश्वास संपादन करते. ते विश्वास इतका संपादन करते की पराजयातून आलो अंतीम परिवर्तन भासवते. आणी इतिहास हीच गफलत अनेक वेळा झालेली आहे. यातून गौतुम बुद्ध, बळीराजा, अशोकाचे वशंज, संत नामदेव सुटले नाहीत तर मग संत तुकाराम संत संताजी यांचा विश्वास संपादन केला महादजी कुलकर्णी, कडूसकर ही ब्राम्हण सोबती होते पण ब्राम्हण्यवादी नव्हते तसेच परिवर्तन झालेले रामेश्वर भट व इतर मंडळी जी तुकोबाकडे आली या मंडळींनी धुळवडी दिवशी इंद्रायणी नदी काठी संत तुकोबांना संपवले. नदी काठी असलेल्या देहू गावातील सदा मांगाच्या पोराने ही घटना पाहिली. त्याने गावात येऊन सांगीतले. परंतू ब्राह्मण्याने एक दलिताचे पोर म्हणून त्याच्यावर दबाव आणून पुष्पक यानाचा बनाव रचून हे महापातक कायमचे गाडुन टाकले. या लढाइत म्होरक्या  संत संताजी. आता ब्राम्हण्याची एक ठेवण आसते. विश्वास संपादन करून संपवने श्रद्धेला आपल्या सारखा आकार देणेे आणी आपला जो पराभव आहे तयाचे गोडवे गाण्यास त्यांना लावणे त्यातच त्यांचा विजय शक्ती स्थाने संपावणे. काहींना अडगळीत ठेवणे. संदर्भहीन करणे आपल्या विरोधातील सर्व शस्त्रे संपवून टकाणे. आणी कधी ही शस्त्रे सापडली तर त्याचा शस्त्र म्हणुन वापर करता येणार नाही म्हणजे आपल्या वर येणार नाही. उलट ते शस्त्र त्यांना गुलाम करण्यास वापरून आपन अबाधीत कसे राहू हे वागणे म्हणजे ब्राह्मण्य होय. ब्राह्मण्य जपणार्‍या वाढवणार्‍या लोकांचे एक असते ती मंडळी मागील पानावरून पुढे चालू ठेवताना आपले हित वाढवतात. समोरच्याला अज्ञानात ठेवणे, त्याच्या जवळील भक्तीचा फायदा घेणे. व फायद्याचे ठेवणे नको ते नष्ट करणे. यातील एक उदाहरण धुळे येथील वि. का. राजवडे यांनी इतिहासाची पाने नष्ट केली वेळ प्रसंगी तर तोंडाणे चावूण खाल्ली सुद्धा ही अतीशोक्ती नाही सत्य आहे. जेंव्हा मुद्रण कला अस्तीत्वात आली तेंव्हा पंडीत शास्त्री यांना इंग्रज अधीकाररने पैसे दिले तेंव्हा तुकोबा गाथा देवनागरीत आली त्यांनी ब्राम्हण्य पणाला साक्ष ठेऊन बराच फेरबदल बरेच अभंग नष्ट ही केले. परंतू त्यातून जी जीवंत गाथा राहिली त्यात ही ब्राह्मण्याला तुकोबा उघडे केले होते हा राग राजवाड्यांच्या जवळ होता. म्हणुन त्यांनी रामदासांचा दासबोध समोर आनला. रामदास हा ब्राह्मणांचा प्रतिनीधी संत संताजी  व संत तुकाराम हे बारा मावळातील मावळ्यांना स्वातंत्र्य बंधुभाव समता शिकवत होते. यातूनच छ. शिवरायांना स्वातंत्र्याला पोषक वातावरण तयार झाले असे सुखठणकर आपल्या संत मंडळींचे एैतिहासीक कार्य या पुस्तकात नमुद करतात. आणी त्याच दरम्यान विजापूरचा अदिलशाहा त्याचा नोकर मुरार जोगदेव जन्माने ब्राम्हण होता. यानेेच पुण्यात गाढवाचा नागर फिरवला उलटी पहार रवली. तो हा मुरार जोगदेव व बाजी घोरपडे हे विजापूर करांच्या दरबार महत्वाचे सरदार हाते. यांच्या अश्रयाला रामदास होता. यांच्याकडून त्यांने चाफळला मठ बंधावयास जागा मिळवली. संताजी संसारी होते. रामदासांनी लग्न मंडपातून पळ काढला व आक्का व वेणू या शिष्यणी ठेवल्या असा इतिहास सांगतो. संताजी देखत शिवरायांनी तुकोबांना नजरांणा दिला तो त्यांनी नाकारला. पण रामदास मला काही तरी द्या म्हणत असे. माझ्याकडे लक्ष द्या म्हणत असे. तुकोबाचे केंद्र लोहगाव होते. त्यामुळे शिवराय तुकोबा संताजी भेटी होत होत्या. स्वराज्य घडणीत त्यांचा सहभाग होता. तर रामदास विजापूर शाही संपल्या नंतर शिवरायकडे आले. मग गुरू शिष्य कसे होऊ शकतात. संताजींनी प्रस्थापितां विरोधी बंड केले संसार ही केला. पण ब्राम्हणी धर्म पाया खाली तुडवला म्हणून त्यांना झाकून टाकले. पण रामदासाचे तसे नाही. सुरूवातीला शिवराया विरोधी नंतर शिवरायाकडे आश्रयाची विनंती. रामदासांचा जो दास बोध आहे शके 1602 मध्ये रामदास वारले त्यांच्या दासबोध सात शतकांचा त्या नंतर दत्तात्रय स्वामी व नारायण स्वामी यांच्याकडील प्रती यात कोठेच शिवरायांचा उल्लेख नाही. परंतू जेंव्हा पेशवाई आली. पेशवाईचा सुवर्ण काळ आला तेंव्हा संत संताजींना संपवून टाकले होतेे किर्तनाच्या फडात तुकोबाचे अभंग म्हणने संताजींच्या नावाचा वापर करणे यावर बंदी होती. परंतू याच वेळी दासबोधात अनेक गोष्टी निर्माण झाल्या. याच वेळी बखरी लिहील्या. आजही बाबा पुरंदरे आपल्या छत्रपती शिवराय यांच्या विषयी त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाला इतिहास म्हणु नका ती कादंबरी आहे.. असे जेंव्हा सत्य चव्हाट्यावर आले तेंव्हा सांगू लागले. अशीच गोष्ट दासबोध व बखरी. शिवाजींचे गुरू रामदास स्वामी बिंबवतात आज तेली, माळी, न्हावी, कुंभार या समाजाला पुन्हा गुलाम करण्यासाठी रामदास स्वामींच्या नावाने बैठक असतात. या बैठकीस जाणार्‍यांना रामदास स्वामी हे गुरू म्हणुन मानावे लागते. म्हणुन एक प्रश्न गुरू सांगणार्‍या व एैकणार्‍यांना, संत संताजी, संत तुकारात यांनी ती स्वराज्याची भुमी तयार केली. त्यांनी काही मागीतले नाही पण हा रामदास स्वामी हा शिवरायांची बायको गुरूदक्षीणा म्हणून मागतो. म्हणजे ब्राह्मण किती निच आहे हे स्पष्ट होत. दुसरी एक बाब त्यांच्या म्हणाण्या प्रमाणे मान्य केले नंतर प्रश्न उभा रहातो. शिवराय जेंव्हा राज्याभिषक करीत होते. तेंव्हा त्यांना त्याचा नोकर असलेला मरोपंत पिंगळे शुद्र म्हणुन विरोध करतो. गांगाभट येतो तो ही विरोध करतो तो कायस्थ सरदाराला राज्याभिषेक करा सांगतो. या वेळी शिवराय गांगाभटाला लागेल तेवढी दक्षिणा देतात. 50 हजार बा्रम्हण सलग तिन महिने मिष्ठान्न गडावर जेवायास होती. राज्यभिषकास उपस्थीत म्हणून सोने व पैसे घेतलेच उलट गड उतरताना त्यांना हे ओझे सहन होत नव्हते. यावेळी गांगाभटाने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेकाचा टिळा शिवरायांना लावला. राज्याभाषेक सुरू असताना इंग्रजी अधीकारी उपस्थीत होते. पण रामदास का नव्हते. याला एैतिकासीक साधने की शिवकाळातील आहेत पेशवाईतील बखरी नव्हे ती सांगतात छ. शिवरायांचा व रामदासांचा संबंध आलाच नाही. संबंध आला संत तुकारामांचा सोबत संताजींचा. हे ढळढळीत सत्य लपवण्यासाठी ब्राम्हण्य का कपट निती वापरते. ती वापरून शिवराया पासून तुकोबा व संताजींना वेगळे करून आपले महापुरूष कोपर्‍यात ठेवणे नमस्कार, पुजा, भजन व टाळ कुटण्या पुरते ठेवणे. आपली शक्ती, आपली स्फुर्ती नष्ट करणे. दासबोध हा रामदासांनी ब्राम्हण्य श्रेष्ठ ठरविण्यासाठी लिहीला तर तुकाराम व संताजींचे अभंग निर्मिती, प्रसार व साठवणुक ही. छलवादी, अतीरेकी, घमेंडी, वर्णवादी ब्राह्मणांच्या ढेर सुटलेल्या पोटावर नाचून त्यांचा धर्म वेडे पणा नष्ट करण्यासाठी यज्ञ होता आहे.
    आज मी फक्त तोंड ओळख दिली भविष्यात अधीक वास्तव समोर येईल. तेंव्हा आपण संताजींच्या मारेकर्‍याचेच भक्त म्हणुन पोवाडे गात आसु तर काळ क्षमा करणार नाही. 

copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
You might like:
santaji maharaj jagnade & vitthal
संताजी महाराज जगनाडे : अन्यायाविरुद्धचा वारकरी
santaji jagnade maharaj palkhi sohala bail jodi
श्री. संताजी महाराज यांच्या पालखीसाठी ज्ञानोबा भगत यांच्या बैलजोडीस मान.
sant santaji maharaj & pandurang
संताजी पालखी सोहळ्याचे पांडुरंगाचे दर्शन.
Janardhan jagnade shri santaji maharaj jagnade sanstha adhyaksh Teli
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Teli Samaj all News Articles