तेली समाजाची संघर्षाची वाटचाल म्हणजे खा. तडस

ramdas Tadas

तेली समाजाची संघर्षाची वाटचाल म्हणजे खा. तडस - प्रकाश गिधे उपाध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पु. जि.

    मी तसा चळवळीतला माणुस दत्ता सामंत यांच्या संघटेनेचा घटक. तो मिल कामगारांचा लढा लढलो आणी गिरणीबंद पडताच गावाकडे आलो. जवळ होते शुन्य उभा राहिली आणी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष एकट्याचा. माझे गाव डोंगर दर्‍यातले सर्व साधने कमी अंगावर पाऊस घेऊन लढताना जाणवले मी एकटा आहे. परंतु माझ्या सारखे परिस्थीतीने गंजलेले माझ्या गावात माझ्या तालुक्यात, हजारो आहेत. ही सर्व मंडळी पिचत भरडत रडत आहेत. त्याच्या जगण्याची धडपडीची जाणीव कुणालाच नाही. आपन एकत्र येऊ ही ओळख ही नव्हती आणी आपन असेच पोटातले दु:ख उरात ठेवून वावरावे ही आमची ठेवन होती. शहरी भागात असलेले समाज संघटन आम्हाला आपले म्हणत नव्हते त्यांचे प्रश्न व त्यांचेच मोठेपण आमची फक्त पहात रहाण्याची ठेवण दिलेली. आशा वेळी आम्हा ग्रामीण भागाला महाराष्ट्र तैलिक महासभेने नवी ओळख दिली. आमचे संघटन करण्यास दिशा दिली ही दिशा मुळात दिली ती खासदार रामदास तडस यांनी. गेली तिन तप त्यांनी संघटनेची बांधनी सुरू केली दोन घरे एकत्र येत नाहीत तथे एक कोटी समाज बांधव एकत्र आले.  अनेक शाखा या शाखेत पुन्हा मते. या सर्वांना तेली म्हणून एकत्र आणने तसे सरळ व सोपे तर अजीबात नाही. पण हे अशक्य काम त्यांनी केले हे मान्य करावे लागेल. कारण त्यांनी विदर्भातील आपली देवळी हे गाव सोडून महाराष्ट्र पिंजून काढला. तो काढला म्हणून समाजएकत्र आला. अनेक शाखा, पोटशाखा विभाग भेद, चाली, रिवाज वेगवेगळे असुन ही तेली म्हणुन आपण एकत्र येऊ शकलो.

    आज आमदाराची भेट घेण्यासाठी देवळा सारखी लांब रांग लावावी लागते. खासदार साठी किती तरी दुर्मीळ बाब पण मी स्वत: अनुभवले गतवर्षी 1 एप्रील 2016 रोजी मी व श्री मोहन देशमाने त्यांच्या वाढदिवसाला देवळीला गेलो तेंव्हा त्यांनी घरातल्या माणसा सारखे केलेले स्वागत विचारपुस आगदी घरचे जेवण देण्याची माणसीकता हे अनुभवल्या नंतर मला खा. तडस साहेबांचे तेली मन समजुन आले समाजाला संघटीत करणारे मोठे पण विसरून समाजाच्या स्तरावर वावरणारे ते एकमेव आहेत. हे समाजाने विसरून चालणार नाही त्यांच्या संघटीत पणाच्या वाटचालीस सहकार्य दिले पाहिजे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनांक 31-03-2017 22:21:23
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Facebook Tweet Google+
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2018 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com