Responsive Header Nav

छत्तीसगढ़ वैश्य तैलिक युवक युवती परिचय सम्मेलन 2015

छत्तीसगढ़ वैश्य तैलिक युवक युवती परिचय सम्मेलन 2015 का स्मार्ट सिटी बिलासपुर में सफल आयोजन।। जिसमें मुख्य अतिथि के रुप में , मंत्री, छत्तीसगढ़ शासन, श्री अमर अग्रवाल जी, जिन्होंने समाज के शुभ कार्य के लिए 11 लाख की राशि देने की घोषणा की।। सांसद, बिलास्पुर लोकसभा, श्री लखन लाल जी साहू, राष्ट्रीय कार्यवाहक अध्यक्ष,अखिल भारतीय तैलिक साहू महासभा एवं पूर्व डिस्ट्रिक्ट गवर्नर,  

दिनांक 24-01-2017 14:07:17 Read more

बृहन्मुंबई तिळवण तेली समाज मुंबई प्रजासत्ताक दिन

सालाबाद प्रमाणे यावर्षीही २६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे खजिनदार श्री किसन भाऊसाहेब करडिले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा सकाळी ०८.०० वाजता पार पाडण्यात येईल. तसेच सर्व महिला भगिनींसाठी सायंकाळी ४.०० वाजता हळदी-कुकू समारंभ आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधव व महिला भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आपण सर्वांनी सहकुटु्ंब उपस्थित राहुन सायंकाळी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा

दिनांक 24-01-2017 13:04:59 Read more

समाज विकणारे कोण ?

 - डॉ. महेंद्र धावडे, संशोधक :- प्राचीन भारतीय तेली समाज, (इ.स.पुर्व ते 16 वे शतक )

    संताजींचा वापर करून सुदुंबर्‍यांचा विकास घडवु न आणनारे व राजकीय लाभ घेणारे कोण ? समाजाला दावणीलाबांधुन स्वयंघोषीत नेते कोण ? जातीत भांडण लावणार कोण ? संताजींचे जीवन चरीत्र शासन स्तरावर प्रकाशीत करण्यासाठी धडपडणारे कोण ? राजकीय पक्षांना समाजाचा पाठिंबा देणारे कोण ? समाजाचे शोध ग्रंथालये सुरू करणारे कोण ? विद्यार्थांसाठी समाजाचे वसतिगृह चालविणारे कोण ? या सर्व प्रश्‍नांचे उत्तरे समाजातील होतकरू समाजसेवक, युवकांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. व उत्तर न मिळाल्यास समाजाच्या जाहीर सभा, मेळावे यातुन पदाधिकार्‍यांना विचारावे त्यांनी सत्य दडविल्यास समाजानें त्यंांचे पितळ उघडे पाडुन आशा समाज नेत्यांना वटणीवर आणण्यांचा प्रयत्न केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.

    इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जो समाज हिताचे कार्य करतो. म्हणुन समाज बांधवाना विनंती करतो संताजीला देवार्‍हात बसविणार्‍या पासुन फार मोठा धोका निर्माण झाला आसुन संताजी हे स्वराज्याच्या क्रांतीचे प्रथम शिलेदार होत हे विसरता येणार नाही. म्हणुनच थोतांड दुर्योधनरूपी पासुन समाज विघटनांच्या मार्गावर असेल तर हातात लेखनीची धारदार शस्त्र घेऊन. कौरवांचा पराभव करून पांडवरूपी समाजाची नितीमुल्यावर आधारीत व्यवस्था प्रस्थापित करण्याचा पण घेऊ या. 

दिनांक 02-07-2016 19:09:32 Read more

बनावट ओबीसींचे दाखले सादर करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.

Ramesh Bhoj      पुणे - खोटी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र शासनास सादर करूण बनावट ओबीसींनी मिळविलेले दाखले तात्काळ रद्द करूण, खोटे कागदपत्र व प्रतिज्ञापत्रक दाखल करणारे बनावट ओबीसींचे वर तात्काळ फौजारी दावे दाखल करूण त्यांच्यावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. असे विचार ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश भोज यांनी कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरांमध्ये मांडले.  ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्हा कार्यकर्ता शिबीर पुणे येथे नुकतेच पार पडले. याप्रसंगी खर्‍या ओबीसींवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा करण्यात आली. खोटे ओबीसींचे दाखले मिळवुन तिकीटे मिळवुन निवडुन येतात अणि त्यातच खर्‍या ओबीसी असणार्‍या उमेदवारावर अन्याय होतो. ओबीसी समाज हा मध्यमवर्गीय असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या मागासलेला असुन त्यामुळे सक्षम असणार्‍या उमेदवाराला टक्कर देवु शकत नाही. या प्रसंगी ओबीसी सेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मोहन देशमाने पुणे  जिल्हा काया्रध्यक्ष संदिप थोरात युवा अध्यक्ष विशाल सुपेकर, दिलीप शिंदे, महेंद्र शेलार, लक्ष्मण कावडे, पंडीत चौधरी पुणे शहर अध्यक्ष, चंद्रकांत शिंदे, महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष सौ. रेखाताई रासकर, व अनेक कार्यकर्ते हजर होते. या प्रसंगी ओबीसी सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन ही मोहन देशमाने यांचे हस्ते करण्यात आले.

दिनांक 02-07-2016 10:58:51 Read more

श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत.

    युवकांच्या हाती सत्ता दिली तर ते देशाचा फार मोठा विकास करतील, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. युवक म्हणजे उत्साहाचा झरा मुर्तिमंत झळाळते चैतन्य युवकांमध्ये फार मोठी शक्ती आहे. मी तुम्हांला आशाच युवकाची आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत.

    पण त्यांनी दिवसभर राब राब राबायचे 24 तास काम करायचे आणि नोकरीत पर्मनंट नाही. हा अन्याय कशासाठी ? त्यांनाही मुले - बाळे आहेत, संसार आहे. नोकरीवरून काढले तर खायचे काय ?  त्यांना नोकरीत पर्मनंट केलेच पाहिजे

    बंधुभगिनींनो अशा प्रकारे दुसर्‍यांसाठी भांडणारा झगडणारा हा तरूण. त्यावेळी ते होते 26 वर्षांचे वडिलाच्या शब्दाचा मान राखण्यासाठी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. युनियन निवडणुकीत उभे राहिले, भरघोस मतांनी निवडुन आले. यावरून त्यांच्याबद्दल कामगारांना केवढा विश्‍वास होता हे दिसते निवडुन आल्याबरोबर त्यांनी 250 लोकांना पर्मनंट करण्यात सिंहाचा वाटा घेतला. आज त्या लोकांचे संसार सुखात आहेत.

दिनांक 02-07-2016 10:36:44 Read more

इंदोरी तेेली समाजाचे श्री. उद्धवराव भागवत

    एैतिहासीक परंपरेतील हे गांव याच गावात भागवत पिड्यान पिड्या रहातात. याच गावात याच घरात श्री. अंबादास शिंदे यांचे आजोळ. जवळच सुदूंबरे. श्री. उद्धवराव घडले ते सुदूंबरे व इंदोरीत जमेल तेवढे शिक्षण पुर्ण करून त्यांनी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. वडील कै. धोंडीबा राऊत यांच्या बरोबर मंदिरात भजनात पखवाज वाजवत होते. श्री. भागवत हे लहानपणापासुन सुदूंबरे येथेे श्री संताजी स्मृती दिनात सामिल होते आहेत. आज सेवा निवृत्त असल्याने बराच वेळ शेती व समाज कार्यात मग्न असतात.

दिनांक 02-07-2016 10:29:11 Read more

श्री. देवीदास साळुंखे भानस हिवरेचे सरपंच

    हिवरे येथिल श्रीराम ग्रामीण पतसंस्थेच्या उभारणीत सहभाग स्थापने पासुन ते संचालक आहेत. गत दहा वर्ष ते पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ही आहेत. अहमदनगर जिल्ह्या जे माथाडी बोर्ड आहे. त्या बोर्डच्या कमिटीवर ही सदस्य म्हणुन काम करीत आहेत. श्री. सदाशिव साळुंखे यांचा नेवासा मार्केट कमीटी उभी करण्यात संचालक म्हणून फार मोठा सहभाग. या मार्केट कमिटीवर श्री. देवीदास साळुंखे संचालक म्हणुन काम करित होते. या कार्य काळात ते मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन म्हणुन होते, शेतकरी व्यवसायीक यांच्या  व्यवहारा बरोबरच मार्केट कमिटीचा विकास यातील बारकावे वापरल्या मुळे सुसंवाद साधणारे संचालक ही त्यांची प्रतिमा होती. म्हणुन गतवर्षी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्याची नियुक्ती मार्केट कमिटीवर तज्ञ संचालक म्हणुन केलेली आहे.

दिनांक 11-06-2016 01:01:07 Read more

back123456789next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com