अहमदनगर जिल्हा तेली समाज सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी आवाहन

         सनई - १२ ऑक्टोबर २०१९ रोजी साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्याचे श्री.क्षेत्र शिर्डी ता. राहता, जिल्हा-नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका विवाह समारंभात वधू-वर नाव नोंदणी फार्म देऊन एक आगळे वेगळे नाव नोंदणी अभियान नाशिक

दिनांक 23-07-2019 00:56:54 Read more

अहमदनगर जिल्हा तेली समाज वधू-वर मेळाव्‍याचे आयोजन 

          साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दिनांक 23-07-2019 00:48:18 Read more

संताजी महाराज ट्रस्ट राजगुरुनगर  तर्फे पांगारी जि. प. शाळेत साहित्य वाटप

         राजगुरुनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा पांगारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हॅप्पी स्कूल प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

         या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, संताजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव कहाणे आदी उपस्थित होते. उपसरपंच भरत बुट्टे, अविनाश कोहिनकर व अविनाश कहाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश घोलप यांनी सूत्रसंचालन; तर प्रा. संदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.

दिनांक 17-07-2019 23:36:11 Read more

मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ

           मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.)  रविवार दि. ०७/०७/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. नाना नानी पार्क, भंडारी हॉस्पिटलसमोर, तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे  प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ (विभागीय अध्यक्ष, पुणे विभाग)

दिनांक 03-07-2019 13:41:59 Read more

मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी फेर निवड

      मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.

दिनांक 20-06-2019 23:49:04 Read more

श्री शनि मारुती मंदिर इंदोरी पदाधिकारी

        श्री शनि मारुती मंदिर इंदोरी प्रथम वर्धापन दिन  11 मे  2019  वार  शनिवार असून नियोजनासाठी दिनांक 4 मे 2019 रोजी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये पुढील कालावधीसाठी श्री शनि मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट इंदोरी च्या अध्यक्षपदी -श्री सचिन नथुराम अवसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पुढील कार्यकारणी खालील प्रमाणे  श्री जयंत सूर्यकांत राऊत कार्याध्यक्ष , श्री प्रशांत चंद्रकांत भागवत उपाध्यक्ष

दिनांक 20-06-2019 23:55:37 Read more

नाशिक शहर तेली समाजाच्‍या वतिने नवनिर्वाचित खासदार मा.रामदासजी तडस साहेब यांचा भव्य सत्कार सोहळा

            महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, वर्धा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा.रामदासजी तडस साहेब तसेच नाशिक शहर व जिल्हा तेली समाजाचे इतर मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा नाशिक शहर तेली समाज तसेच सर्व विभाग व जिल्हा तेली समाजाच्या वतीने बुधवार दि.१२/६/२०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, नाशिक येथे

दिनांक 11-06-2019 14:03:46 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com