Responsive Header Nav
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com

तेली समाजातील श्रेष्ठ व्यापारी म्हणजे श्री. शंकरराव नवपुते

    तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते.

तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया

ramdas tadas

तेली समाज संघटनेची दिशा मा. खासदार तडस साहेबा कडून शिकुया.  - विजय काळे, अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा नगर

    आम्हा समविचारी बाधवांना समाज कार्य करण्यात नवखेपणा होता तेंव्हा नगर वासीयांनी देश पातळीवरील समाजाचा विचार मेळावा नगर येथे ठेवला होता. पहिल्या सत्रात समाजमाता केशकाकु यांची निवड देशपातळीवर झाली. त्यावेळी तडस साहेब विधान परिषदेत आमदार होते. मी कसा तेली समाजामुळे आमदार झालो. आणि म्हणून आपन एक झालो तर आपले हक्क मिळवू शकतो.

तळातल्या माणसाचा श्वास  खा. रामदास तडस :- सारंग रघटाटे

ramdas tadas

    महाराष्ट्राच्या जडण घडणीत देशाच्या सामाजीक, सांस्कृतीक विकासाचा दिशा दर्शक म्हणुन वर्धा जिल्हा ओळखला जातो ही ठेवण आज ही जपली जाते. या जिल्ह्याने माणुस घडवीण्याची प्रक्रिया सुरू केली. एक कष्टकरी घर एक शेतकरी घर, एक पैलवान घर आशा समान्य घरातील श्री. रामदास तडस कृषी उत्पन्न बाजार समीतीचे एक सदस्य म्हणुन राजकीय क्षेत्रात उमेदवारी सुरू करतात व आज वर्धा मतदार संघाचे खासदार म्हणुन निवडून जातात.

संताजी कॉन्व्हेंट चे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश बुलढाणा

             बुलढाणा - स्थानिक संताजी कॉन्व्हेंट मेहकर येथे शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्ग ५ व वर्ग ८ मधील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम सुयश प्राप्त केले आहे . वर्ग ५ मधून १) प्रणव तेजनकर २) कु.प्राची आघाव ३) कु. प्रियंका अंभोरे ४) आनंद गवई ०५) अनुज मोरे ६) देवाशीष देठे व वर्ग ८ मधून १) कु.वेदिका डोंबळे २) शोनक व्यवहारे ३) सौरव तोंडे ४) कु.नम्रता जुनघरे

श्री संत संताजींच्या मुळे श्री संत तुकाराम आपल्यासाठी राहिले. मा. सदानंद मोरे

     पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे.

Teli
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2017 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
Teli Samaj all News Articles