Teli Samaj Aurangabad Teli Samaj Aurangabad

तेली समाज परभणी च्‍यावतीने जय संताजी युवा प्रतिष्ठाण ची स्‍थापना

         राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाजातील तरुण युवकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वा. रोकडा हनुमान मंदिर, नवा मोंढा, परभणी येथे समाजातील युवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 27-03-2019 15:45:44 Read more

अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार

Ahmednagar Tilvan Teli Samaj Trust Utkrisht Sanstha State Level Puraskar        राज्यात आज अनेक संस्था विविध उपक्रमांतून  समाजाची सेवा करत आहेत. त्यांची  समाजाप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. अशा संस्थांचा संताजी सेवक संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहे,' असे प्रतिपादन पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमाने यांनी केले. पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेच्या वतीने अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अध्यक्ष मोहनराव देशमाने यांच्या हस्ते सचिव प्रभाकर देवकर व खजिनदार प्रसाद शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  या वेळी प्रभाकर देवकर, प्रसाद शिंदे आदींची भाषणे झाली.

दिनांक 14-01-2019 22:08:18 Read more

संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त पैठणमध्ये पद्मपुराणकथेची सांगता

           ११ जानेवारी पैठण : संत तुकाराम गाथेचे लेखक श्री.संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील तेली धर्मशाळेत पद्मपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. तीन जानेवारी पुण्यतिथी निमित्त कांबी येथील किशोर महाराज भिषे यांचे किर्तण झाले. तसेच भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या आमृतवाणीतुन सात दिवस पद्मपुराणाचे सुश्राव्य निरुपण झाले. व पुष्कर गोसावी यांच्या भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला.

दिनांक 16-01-2019 21:42:00 Read more

तेली समाज पैठण श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा

            पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे

दिनांक 27-04-2019 01:08:26 Read more

तेली समाजाला एकत्र आणण्यासाठी तयार केला Whatsapp ग्रुप

        धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक Whatsapp  ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी Whatsapp  ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत.

दिनांक 29-03-2019 00:10:45 Read more

औरंगाबाद तेली सेनेच्या वतीने शिक्षकांचा सत्कार

       औरंगाबाद : तेली सेनेच्या वतीने जगनाडे महाराज आयटी पार्कमध्ये तेली समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयटी पार्कचे अध्यक्ष विश्वनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. ह भ प बापूराव सोनवणे, भगवान बागूल, विजय गवळी, डॉ.उज्वल करवंदे, सुनीता मचाले, बबिता राऊत यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. आभार पवार यांनी मानले,

दिनांक 23-03-2019 20:17:24 Read more

पैठण तेली समाजाच्‍या वतीने गोदावरी स्वच्छता अभियान

      पैठण - संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांच्या सूचक कल्पनेतून गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले,  यावेळी पैठण नगर परिषद अध्यक्ष दत्ता गाडे, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी तिळवण तेली समाजाचे अध्‍यक्ष प्रल्‍हाद संद‍लंबे , उपाध्‍यक्ष देशमुख महाराज आळंदीकर,

दिनांक 28-12-2015 00:00:00 Read more

12345next
Teli
Sant Santaji Maharaj Jagnade
Sant Santaji Maharaj Jagnade संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2019 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com